सांग सांग भोलानाथ
अप्राईझल होईल का?
रोजची माझी लेटनाईट
फळाला येईल का?
रोज रोज लीड माझा
खुन्नस देतो भारी..
त्याच्यावरची पोस्ट मिळून
जिरेल का रे सारी….
भोलानाथ भोलानाथ….
दुचाकीची चार चाकी
होईल का रे गाडी..
डब्बल तरी खिशाची या
वाढेल का रे जाडी..
भोलानाथ भोलानाथ….
दरवर्षी जड जाई
अप्राईझलचं नाटक..
आवंदातरी उघडेल का रे
नशिबाचं फाटक…
भोलानाथ भोलानाथ….
—————————————————————————————-
—————————————————————————————-
हृदय अर्पण करतातती माणसं निराळीच असतात पूर असतो त्यांच्या स्वभावातकिनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतातकोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात!जशी हसतात फुलं, पूर्ण उमलतात,उधळतात गन्ध्, गळून पडतातनियतीचा सहज स्विकार हृदय देणारेच करतातअश्रुंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतातप्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात
तीचि स्तुति करुन तिला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधि जमलेच नाहि ॥१॥
म्हणुन आम्हाला प्रेम…
कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन
आमच्या तत्वात कधि बसलेच नाहि ॥२॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कोणिजर आवड्लिच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधि जमलेच नाहि ॥३॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याचि संधि
आम्हाला कधि साधताच आलि नाहि ॥४॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाहि
यावेतिरिक्त दुसरे काहि
आम्हाला ऎकायलाच मिळाले नाहि ॥५॥
म्हणुन आम्हाला प्रेम…
प्रेमात नाहिचा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाल कधि समजलेच नाहि ॥६॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
फुलपाखरा प्रमाणे आम्हि हि
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाहि ॥७॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि……..

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !
परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !
पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.
अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!
पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

